मंगलवार, 10 फ़रवरी 2015

तडपती रान सारे

******* तडपती रान सारे*************
हे तडपती रान सारे, तडपती फुल बागा
आगीसारख्या या उन्हाने जीवन उजाडला सारा //धृ//
भट्टी तापिली तापिली वर कोऱ्या आभाळाची,
सर्व प्राण्यांपक्ष्यांना लागली चाहूल प्राणाची
उन्हामुळे रान झोपी गेले शांत झाल्या पायवाटा //१//
कसे देव हे कोपले, सारे जीव लागले मरायला,
या वृधावृक्षाचे देखील पान लागली गळतीला
नसत होऊ लागले बागा ऱ्हास झाला निसर्गाचा //२//
आला श्रवणाचा महिना घेऊन आनंदाचा सन,
पुल्लकित झाले जीव सारे आले प्राणात प्राण
होई चहूकडे हर्षोल्हास मिळे थंडगार छाया //३//

दशरथ ठाकरे
धामणगाव

Share Button
Read Complete Poem/Kavya Here http://www.hindisahitya.org/46925

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें